Sacred Background
Shri Swami Samarth

|| श्री स्वामी समर्थ ||

।। श्री स्वामी समर्थ ।।

मनोगत

“प्रभो मी न माझा तुमचाची होवो
त्वद इच्छेप्रमाणे ही कृती राहो
असे हे कृपाळा तुम्हाला वाहिलो मी
चरणार्विंदार्पणमस्तु स्वामी”
वैद्य गणेश लक्ष्मणराव शिंदे

धर्म-धारयति इति धर्मः
जो धारण केला जातो, जो धारण करायला शिकवतो तो हिंदू धर्म.

'हिनान् गुणान् दुषयती हिंदूनी' याचा अर्थ दोषाचा त्याग तर अपेक्षित आहे व त्याच बरोबर हीन गुणांचा त्यागसुध्दा करतो तो हिंदू.

अशा या हिंदू धर्माची अध्यात्मिक क्षेत्रातील वाटचाल ही अफाट आहे. त्यामध्ये अनेक संप्रदाय वेगवेगळ्या मार्गाने अध्यात्माचा विचार करतात. त्यामधीलच एक 'श्री दत्तसंप्रदाय' अत्री व अनुसुयानंदन असे "श्रीदत्त" सद्गुरु राज त्यांचा दुसरा अवतार "श्री श्रीपाद श्रीवल्लभ", तिसरा अवतार "श्री नृसिंहसरस्वती" व चौथा अवतार "श्री स्वामी समर्थ".

याच श्री स्वामी समर्थांनी ३०० हून अधिक योगी या हिंदूस्तानच्या भूमीला दिले. त्यांनी येथे अनेक चमत्कारी लीला करुन दाखवल्या.

अशा 'श्री स्वामींनी' हिंदू धर्मातील पायाभूत सिध्दांत स्तोत्र रुपाने मला ध्यानावस्थेत दिले त्यांचेच अवतरण या वेबसाईटच्या (Website) रुपाने करण्याचा चिमुकला प्रयत्न येथे केला जात आहे.

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांचा हा प्रसाद www.shreeswami.com या वेबसाईटच्या रुपाने सर्व भाविकांपर्यंत पोहोचवत आहोत.

— वैद्य गणेश लक्ष्मणराव शिंदे